August 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बावधन पोलीस स्टेशन चे नवे रूप, पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांचा पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज च्या वतीने स्वागत व सत्कार

बावधन :

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या बावधन पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री अनिल विभुते यांचा पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज च्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् व हिमालय नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेन्द्र बांदल, सुहास दगडे, NCP चे जिल्ह्याचे नेते संतोष दगडे व T.V.-9 चे पत्रकार प्रो. संजय दुधाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

बावधन गाव आता गाव न राहता शहराकडे वळत चालल्याने सुरक्षितता ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. केवळ बावधनच नव्हे तर सुस, पिरंगुट, भूगाव, भुकूम अशा सर्व समीप रहिवाश्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. या सर्व नागरिकांसाठी विशेष नवीन पोलिस स्टेशन बावधन येथे प्रस्थापित केल्याने आता चोरी मारी व गुन्हेगारीला मोठा आळा बसून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना चपराक व प्रबंध बसण्यास नक्कीच मदत होईल असे मत येथील रहिवाश्यांनी व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी देखील याबद्दल धन्यवाद देऊन स्वागत केले.