May 29, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वर वाडी येथे कोथरूड विधानसभा उमेदवारी मिळाल्याने चंद्रकांत दादांचे जल्लोषात स्वागत, श्री क्षेत्र सोमेश्वराचे घेतले दर्शन…

बाणेर :

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल त्यांनी सोमेश्वर येथे सोमेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी सोमेश्वरवाडी येथील सोमेश्वर देवस्थान, ग्रामस्थ आणि सचिन दळवी मित्र परिवाराच्या वतीने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे जंगी स्वागत करुन, विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची देखील उपस्थिती होती त्यांचा देखील सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ आणि सचिन दळवी मिञ परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

उमेदवारी जाहीर झाल्यामुळे चंद्रकांत दादांचे स्वागत करतांना सोमेश्वर वाडी मध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांनी देखिल दादांना शुभेच्छा दिल्या.