December 3, 2024

Samrajya Ladha

कोथरूड विधानसभा मधून मनसेच्या ॲड. किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर..

पुणे :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार मनसेची यादी जाहिर करण्यात आली असून कोथरूड मधून मागील वेळी चंद्रकांत दादांच्या विरोधात जोरदार टक्कर देऊन पराभूत झालेले ॲड. किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून खडकवासल्याला माजी आमदार कै. रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना तर हडपसर मधून साईनाथ बाबर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली.

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना देखील माहीम मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.