बाणेर :
बाणेर येथील महाबळेश्वर चौक मुख्य रस्त्यावर रांका ज्वेलर्स समोर खूप मोठे खड्डे पडल्याने अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता. याची दखल घेत जयेश मुरकुटे(कार्याध्यक्ष, कोथरूड विधानसभा,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)) यांनी महापालिका सहाय्यक आयुक्तांकडे पाठपुरावा करत केलेल्या प्रयत्नामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून या रस्त्याचे डांबरीकरण करून दुरूस्ती करत सर्व खड्डे बुजवून घेण्यात आले.
रस्त्यावर पडलेले खड्डे प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या साठी धोकादायक होते. यामुळे नागरिकांना अपघात होण्याचा धोका निर्माण झालेला त्यामूळे त्वरित सहाय्यक आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करत सदर खड्डे डांबरीकरण करून घेत बसविण्यात आले. कोणताही अपघात होऊ नये म्हणून अगोदरच खबरदारी घेणे कधीही चांगले. नागरिकांचे सुरक्षितता ही माझी जबाबदारी मी समजतो म्हणून महाबळेश्वर चौकातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवून घेण्यात आले
–जयेश मुरकुटे
कार्याध्यक्ष, कोथरूड विधानसभा,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी