August 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

ना. चंद्रकांतदादा पाटील बाणेर ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या दर्शनाला, ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत.. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती

बाणेर :

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज त्यांनी बाणेर मधील ग्रामदैवत श्री भैरवनाथाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी ग्रामस्थांकडून ही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे जंगी स्वागत करुन, विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची देखील उपस्थिती होती. श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट वतीने दादांचे स्वागत करण्यात आले.

 

यावेळी भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदेरे, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, पुनम विधाते, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष राहुल पारखे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट सचिव अनिकेत मुरकुटे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट चे मंगेश मुरकुटे, प्रवीण शिंदे, सरचिटणीस सचिन दळवी, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष अस्मिता करंदीकर, राहुल कोकाटे, मोरेश्वर बालवडकर, अर्जून शिंदे, अर्जून ननवरे, विकास कामत, डॉ. राजेश देशपांडे, शिवम सुतार, राजेंद्र पाषाणकर, प्रवीण शिंदे, उत्तम जाधव, विवेक मेथा, रोहन कोकाटे, सचिन सुतार, सुभाष भोळ, सचिन सुतार,सुशील सरकते,कल्याणी टोकेकर, निकीता माथाडे, वैशाली कमासदार, सुजाता धनकुडे आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर रविवारी कोथरुडचे ग्रामदैवत म्हातोबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. आज सोमवारी पाषाण मधील मारुती भैरवनाथ, बाणेर मधील भैरवनाथ मंदिर आणि सोमेश्वर वाडीतील सोमेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी नागरिकांकडूनही नामदार पाटील यांचे जंगी स्वागत केले.

 

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत माननीय नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्व पुणेकरांनी भरभरून आशीर्वाद दिले. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ७५ हजारांचे मताधिक्य मिळाले. आता विधानसभा निवडणुकीत माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना एक लाख मताधिक्याने विजयी करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन केले.

यावेळी नामदार पाटील कृतज्ञता व्यक्त करत, गेल्या पाच वर्षांत कोथरुडकरांची सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे पक्षाने पुन्हा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देऊन कोथरुड करांच्या सेवेची संधी दिली आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहोत, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदेरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत बाणेर बालेवाडीकरांनी मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही चंद्रकांत पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असा भैरवनाथाच्या साक्षीने शब्द देतो, अशी भावना व्यक्त केली.

बाणेर करांच्या वतीने स्वागत करत भाजपा नेते गणेश कळमकर यांनी दादांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्व जणांना सोबत घेऊन एकजुटीने प्रयत्न करणार आहे. चंद्रकांत दादांना उमेदवारी मिळाल्याने आम्हा सर्वांमध्ये प्रचंड उत्साह असून मतदानाचा टक्का वाढवून जास्तीत जास्त मताधिक्याने दादांना विजयी करू असे आश्वासन दिले. तसेच दि २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सर्वांनी उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ उपस्थित राहावे असे आवाहन गणेश कळमकर यांनी केले.

 

 

You may have missed