November 21, 2024

Samrajya Ladha

सुस शाखेतील पेरिविंकल च्या विद्यार्थ्यांनी आंतरशालेय राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेत मारली बाजी !!!

पिंपरी :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेतील विद्यार्थ्यांनी एकच नव्हे तर तब्बल तीन क्रमांक पटकावले. पिंपरी येथे झालेल्या उडान 2.0 या आंतरशालेय राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेत 3 ग्रूप सहभागी झाले होते. त्यात इयत्ता ३री, ५ वी व ७वी चे विदयार्थी ग्रुप डान्स मध्ये सहभागी झाले होते. त्यात तिन्ही ग्रुप डान्स ने दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावून परत एकदा पुण्याबरोबरच पिंपरी येथील शाळांमध्ये देखील पेरीविंकल च्या सूस शाखेने एक मानाचा तुरा रोवला आह़े.

रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी UDAAN 2.0 (उडान २.० ) आयोजित आंतरशालेय राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेचे आयोजन हे पुणे रेकॉर्ड्स तर्फे वैभव घुगे यांच्या परिक्षणाखाली पिंपरी येथील आचार्य अत्रे या आलिशान प्रेक्षागृहात करण्यात आले होते. या स्पर्धेत 50 हुन अधिक शाळा सहभागी झाल्या होत्या. तर २०० हुन अधिक सहभागी होते. यात प्रियदर्शनी स्कूल , पोद्दार स्कूल, लिटिल गॅलगझी स्कूल, पेरिविंकल स्कूल, SNBP, न्यू इंडिया स्कूल, मिटकोंन ,C.M. International स्कूल अशा अनेक पिंपरी चिंचवड, चाकण, बाणेरच नव्हे तर पुण्याबहेरून म्हणजेच नाशिक, मुंबई, धुळे, नगर अशा विविध शहरांमधून अनेक भागातील शाळा सहभागी झाल्या होत्या. कोणतीही लोककला ही थीम घेऊन नृत्य सादरीकरण करण्याकरिता सोलो किंवा ग्रूप डान्स या मधून प्रत्येक वयोगटातील 50 पेक्षा अधिक गटांनी यात भाग घेतला होता.

त्यातील पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूल च्या सूस शाखेतील इयत्ता ३री , ५वी व ७वी तील विद्यार्थ्यांनी बरसो रे मेघा, गोंधळ व लावणी यावर आधारित अतिशय रोचक असा अभिनय नृत्याद्वारे सादर केला. या सर्व परफॉर्मन्स ने व विद्यार्थ्यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून केवळ मुळशीतच नव्हे तर पुण्याबरोबर पिंपरी चिंचवड भागात सुद्धा आपला ठसा उमटवून शाळेची व शिक्षकांची मान उंचावून गौरवास्पद बक्षीस पटकावले आह़े . यात एकूण ३० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्रत्येक ग्रूप मध्ये १० विदयार्थी सामील होते. इयत्ता ३री च्या विद्यार्थ्यांनी बरसो रे मेघा यावरील नृत्यावर द्वितीय तर इयत्ता ५वी च्या विद्यार्थ्यांनी देखील उदो..उदो या गोंधळावर द्वितीय पारितोषिक व इयत्ता ७वी च्या विद्यार्थ्यांना लावणीवर तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफी चे मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप होते . हे व्दितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस पेरिविंकल च्या सूस शाखेने जिंकून बाजी जिंकली. तीन ग्रूप सहभागी होऊन पेरीविंकल च्या तिन्ही ग्रूप नी द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावल्या बद्दल Best School Title ची ट्रॉफी देखील पेरीविंकल स्कूलनेच पटकावली.

केवळ अभ्यासातच नव्हे तर अभ्यासाव्यतिरिक्त व शाळाबाह्य जाऊन कार्यक्रम सादर करुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे ही महत्वाची बाब सूस शाखेच्या बाबतीत वाखाणण्याजोगी आह़े.

पुस्तकातील अभ्यास तर रोजच विद्यार्थी शिकत असतात पण पुस्तका पलीकडे जाऊन अशी शाळाबाह्य स्पर्धेत उतरून टक्कर देणे हे आजकालच्या स्पर्धात्मक जगात अतिशय महत्वाचे आह़े व स्पर्धात्मक जगात टिकून राहून बक्षीस पटकावत आज आत्मविश्वास निर्माण करून स्वतःचे व शाळेचे नाव उज्वल करण्याचा एक प्रयत्न व त्यातून येणारा अनुभव व अनुभवातून मिळणारा आनंद आज पेरिविंकल च्या सूस शाखेतील विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला.

या संपूर्ण शाळाबाह्य स्पर्धेचे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ रेखा बांदल व डायरेक्टर शिवानी बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरिविंकल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
कोरिओग्राफर शिवप्रसाद पुजारी सर यांचा यात मोलाचा वाटा व सहभाग होता . शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत, परीवेक्षिका नेहा माळवदे व वर्गशिक्षिका यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकगण, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवर्ग या सर्वांच्या कष्टाचे फळ व पालकांचा उत्तम प्रतिसाद व पाठिंबा याचे फळ म्हणजेच हे पारितोषिक आहे असे प्रतिपादन शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बांदल सर यांनी करून सर्वांचे अभिनंदन केले.