December 3, 2024

Samrajya Ladha

कै. श्री बाबुराव चिंधु विधाते आणि कै. श्री संतोष बाळासाहेब विधाते यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त आयोजित कीर्तन सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा.

बाणेर :

कै. श्री बाबुराव चिंधु विधाते आणि कै. श्री संतोष बाळासाहेब विधाते यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त आयोजित कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. रविवार, 20 ऑक्टोबर 2024 रोजी गोविंदा गार्डन मंगल कार्यालय, सोमेश्वरवाडी, पाषाण येथे ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते.

ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी आपल्या कीर्तनातून कै. बाबुराव विधाते आणि कै. संतोष विधाते यांच्या समाजकार्याचा आणि सहकार्याचा गौरवपूर्ण वारसा श्री. विशाल विधाते आणि सौ. पूनम_विधाते यांच्याकडून पुढे चालवला जात असल्याचे कौतुक केले. त्यांच्या पुढील सामाजिक प्रवासासाठी शुभाशीर्वाद दिले.

या कार्यक्रमात समाजभूषण हरिभक्त परायण शांताराम महाराज निम्हण आणि मृदुंगमणी पांडुरंग आप्पा दातार तसेच, प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण शेखर महाराज जांभुळकर यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी बाणेर आणि पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ, गावकरी मंडळ ,नातेवाईक आणि विधाते कुटुंबीयांनी आपले वडीलधाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

विधाते परिवाराने अत्यंत आदरयुक्त आणि अनोख्या पद्धतीने या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन केले होते, ज्यामुळे गावकऱ्यांच्या मनात एक वेगळा ठसा उमटला.