May 16, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर गावातील चाकणकर मळा परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार, नवीन पाण्याच्या लाईनच्या कामाचे भूमिपूजन सरलाताई चांदेरे यांच्या हस्ते संपन्न..

बाणेर :

बाणेर गावातील चाकणकर मळा येथे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत होती. नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नातून नवीन पाण्याच्या लाईनच्या कामाचे भूमिपूजन सरलाताई बाबुराव चांदेरे आणि वैष्णवी महिला मंडळाच्या महिलांच्या हस्ते संपन्न झाले.

 

पाण्याचे जीवनातील महत्त्व अमूल्य असून पाण्याची अडचण निर्माण झाल्यास खूप मोठी अडचण निर्माण होऊन नागरिकांचे जीवनमान विस्कळीत होते. विशेषतः महिलांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच चांदेरे साहेब यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले : समीर चांदेरे (युवक अध्यक्ष)

यावेळी राहुलदादा बालवडकर,समिरभाऊ चांदेरे, स्थानिक नागरिक आणि महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.