म्हाळुंगे :
म्हाळुंगे येथिल कुल इकोलोक सोसायटी येथे सौ. पूनम विशाल विधाते यांच्या वतीने आणि वामा वुमन्स क्लब आणि सिंबायोसिस हॉस्पिटल यांच्या सहकार्याने ‘एक दिवस आरोग्यासाठी’ आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिराला सोसायटी मधील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला व आपल्या आरोग्याची तपासणी करत रक्तदान देखील केले.
रोजच्या धावपळीच्या कामातून थोडा वेळ काढून सोसायटीधारकांनी आपल्या आरोग्यासाठी पुढाकार घेतला यासाठी सर्व सोसायटीधारकांचे खरंच अभिनंदन ! स्वतःच्या आरोग्याबाबत दाखल घेत त्यांनी समाजासाठी रक्तदानही केले हे खरोखरच प्रसंशनीय आहे. सर्व डॉक्टर्स, नर्स यांचे खूप आभार त्याचबरोबर नाडी तज्ज्ञ डॉक्टर तेजस्विनी समीर भाले यांचेही आभार. आज मी स्वतः पुढाकार घेत तुमच्या आरोग्यासाठी हा उपक्रम सुरु केला व त्याला वामा आणि सिंबायोसिस हॉस्पिटल ने उत्तम साथ दिली त्यासाठी वामा आणि संपूर्ण सिंबायोसिस रुग्णालय यांचे खूप खूप आभार !
– सौ.पुनम विशाल विधाते
(कार्याध्यक्ष अध्यक्ष,राष्ट्रवादी महिला कॉग्रेस पार्टी,पुणे)
सध्याच्या काळात प्रत्येकाची जीवनशैली अत्यंत धकाधकीची आणि ताणतणावाची झाली आहे. ताणतणावांना सामोरे जातांना अनियमित वेळापत्रकामुळे व्यायाम, आहाराकडे आणि पर्यायाने तब्येतीकडे दुर्लक्ष होते.याची परिणती मधुमेह,रक्तदाब,स्थूलता असे आजार बळावण्यामध्ये होते. अशा वेळेस श्री.संदिप गवळी, कुल इकोलोक सांस्कृतिक मंडळ यांच्या विनंतीस मान देवून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सौ.पुनम विधाते यांनी समाजाला आपण काही देणे लागतो, या भावनेने “आरोग्य व रक्तदान शिबीर” कुल इकोलोक म्हाळुंगे सोसायटीत आयोजित केले.सध्याच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाही लोकांना वेळ मिळत नाही.अशावेळेस अगदी जवळ आयोजित आरोग्य शिबीरला जरूर तपासणी करण्यास रहिवासी जातात. अशा आरोग्य शिबीरात प्रकृती संबंधी संभाव्य आजारासंबंधी माहिती मिळून प्रकृतीबाबत भविष्यात काळजी घेतली जाते. या शिबिरात समाजासाठी आपण काही देणे लागतो या जाणीवेने आणि रक्तदानामुळे लोकांचे प्राण वाचतात,या भावनेने रक्तदानाला सुद्धा रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. सौ. पूनम विधाते यांच्या सामाजिक कार्यासाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी मी,श्री संदिप गवळी व समस्त कुल इकोलोक रहिवासी यांच्याकडून शुभेच्छा…
– चंद्रकांत तांबे (काका)
कुल इकोलोक सोसायटी,म्हाळुंगे पुणे-४५
More Stories
बाणेर च्या योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचा २९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा….
सुस येथील बेला कासा सोसायटीतील मिळकत कराच्या समस्यांचे अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून निराकरण
कोथरुडकर अनुभवणार ‘नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार”ऑपरेशन सिंदूर’वर ले. जनरल राजेंद्र निंभोरकर(नि.) आणि ले. जनरल विनायक पाटणकर (नि.) यांची प्रकट मुलाखत