बावधन :
१३ आक्टोबंर पुणे, औंध येथे झालेल्या पुणे कुमार केसरी स्पर्धेमध्ये पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज बावधन येथील इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी अंतरा दिपक कंधारे हिने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुणे विभागातून अंडर 15 वयोगटातून उपविजेती ठरली.
पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड आयोजित ही राष्ट्रीय उपकेसरी स्पर्धा औंध येथे आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना पेरिविंकल स्कूलमध्ये केवळ शिक्षणच नव्हे तर इतर सुप्त गुण वाढीस लागण्यासाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते व तसे प्रोत्साहन मुलांना नेहमीच दिले जाते. विद्यार्थ्यांमधील इतर कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतील शिक्षक नेहमीच अविरतपणे झटत असतात.
यावेळी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ. रेखा बांदल व तडफदार संचालिका कु.शिवानी बांदल यांनी अंतराचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित पर्यवेक्षिका इंदू पाटील, कल्याणी शेळके यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..