बाणेर :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरुड विधानसभेचे कार्याध्यक्ष मा. जयेश संजय मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून बाणेर येथील यश ऑर्केड सोसायटी आणि सुप्रीम एस्ट्राडो सोसायटी येथील ॲमिनिटी स्पेसची स्वच्छता आणि साफ सफाई करण्याचे काम करण्यात आले.
सदर ॲमिनिटी स्पेस मध्ये झाडे झुडपे वाढल्यामुळे या सोसायटी मध्ये राहणाऱ्या नागरीकांना गेल्या अनेक वर्षापासून विंचू काट्याची अडचण निर्माण झाली होती. तसेच पाणी साठत असल्यामुळे डासांचा त्रास होत होता.
ही अडचण या परिसरातील नागरिकांनी बाणेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभेचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांना सांगितली. यावर त्यांनी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने स्वखर्चातून सदर ॲमिनिटी स्पेसची साफ सफाई आणि स्वच्छता करण्याचे काम करण्यात आले.
More Stories
बाणेर येथे ज्योती कळमकर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग मार्गदर्शनाचे आयोजन
सोमेश्वरवाडीत चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..
मतदार नोंदणी अभियान: बाणेरमध्ये लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सौ पुनम विशाल विधाते यांचा पुढाकार..