पाषाण :
काल ह.भ.प. संजय (बाप्पु) बाजीराव बालवडकर व श्री. अमोल भैय्या बालवडकर आयोजित ‘कीर्तनकार सन्मान सोहळा व भजन साहित्य वाटप कार्यक्रम’ ज्ञानदीप मंगल कार्यालय, सुस रोड, पाषाण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आपल्या भागातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा यावेळी सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच भजन साहित्याचे देखील वाटप केले. दरम्यान आपल्या महाराष्ट्राला लाभलेली भजन, कीर्तनाची अनोखी परंपरा अद्यापही जपून ठेवल्याबद्दल आणि उपस्थित सर्वांनी दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी आळंदी येथील वारकरी भूषण ह.भ.प. ज्ञानेश्वर (माऊली) कदम यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून कीर्तन सेवा प्रदान करत उपस्थितांचे प्रबोधन केले.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..