November 21, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथील सी.एम. इंटरनॅशनल स्कूलने सी बी एस सी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेमध्ये पटकाविले जेतेपद..

बालेवाडी :

आर. एम. के. निवासी उच्च माध्यमिक विद्यालय, तामिळनाडू,आयोजित राष्ट्रीय १४ वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सी.एम. इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी यांनी विजेतेपद पटकाविले. या विजयामुळे संघ एस. जी. एफ. आय. या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

या स्पर्धेमध्ये सत्यसाई विद्याविहार विद्यालय इंदोर-मध्यप्रदेश, इंडियन स्कूल ओमान, प्रायमस प्रायव्हेट स्कूल दुबई, विद्या जिंदाल हिसार हरियाणा, विद्याज्ञान स्कूल उत्तरप्रदेश इत्यादी संघ सहभागी झाले होते.

उपांत्य फेरीत सी. एम. इंटरनॅशनल स्कूलने विद्या जिंदाल हिसार, हरियाणा संघाचा ५-० अशा फरकाने पराभव केला.
या सामन्यात हिमानी रावत हिने दोन, शर्वरी माने हिने एक तर आरना सिंधव हिने 1 गोल करून संघाला विजेतेपद मिळवून दिले .

अंतिम सामन्यात सी एम इंटरनॅशनल स्कूलने विद्याज्ञान स्कूल, उत्तरप्रदेश संघाचा चा १-० गोलने पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
अंतिम सामन्यात हिमानी रावत हिच्या फ्री किक वर आरना सिंधव हिने डोक्याने उत्तम गोल केला.
आशिष कटारा व वैशाली गराड या प्राशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.

या स्पर्धेत शर्वरी माने हिने सर्वश्रेष्ठ खेळाडूचा किताब पटकाविला

एसकेपी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर, सचिव डॉ. सागर बालवडकर, प्रा.रुपाली सागर बालवडकर, आणि सी.एम. इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य इकबाल कौर राणा यांनी सर्वांचे मनःपूर्वक कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा दिल्या.