बालेवाडी :
बालेवाडी येथे भाजपा पुणे शहर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवम बालवडकर आणि प्रियंका शिवम बालवडकर यांच्या भारतीय जनता पार्टी २४ तास जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ आणि कोथरूड विधानसभेचे आमदार कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
नागरिकांची सेवा करत त्यांच्या आलेल्या समस्या सोडविण्यासाठी एक हक्काचे ठिकाण जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातुन उपलब्ध असणार आहे. हे कार्यालय केवळ माझे नाही तर नागरिकांचे आहे आणि नागरिकांसाठी सदैव ते उघडे राहील. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि त्यांची मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. : शिवम बालवडकर (उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा पुणे शहर)
युवा मोर्चाच्या माध्यमातून शिवम बालवडकर यांनी अतिशय चांगले काम करत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. नागरीकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तो झटत असतो. येणाऱ्या पुढील काळात जनसंपर्क कार्याच्या माध्यमातून जनतेला केंद्रस्थानी ठेवून नागरीकांच्या समस्या सोडवत पक्षाला अधिक बळकटी देण्याचे काम करेल याची खात्री आहे. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील पार पडतील. इच्छुकांना अजून जास्त वाट पाहावी लागणार नाही.
– मुरलीधर मोहोळ
केंद्रिय राज्यमंत्रीशिवम उत्साही कार्यकर्ता असून नागरीकांच्या अडचणी सोडविण्याची तळमळ त्याच्यामध्ये आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातुन नागरिकांची सेवा करत आपली राजकीय वाटचाल यशस्वी करेल याची खात्री बाळगत येणाऱ्या पुढील राजकीय भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
-चंद्रकांत दादा पाटील
उच्च तंत्र शिक्षण मंत्री
या उद्घाटन प्रसंगी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव अप्पा चांदेरे, नगरसेविका सौ. ज्योतिताई कळमकर, नगरसेविका सौ. स्वप्नालीताई सायकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजपा कोथरुड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेशदादा कळमकर, भाजपा ओबीसी प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सायकर, भाजपा पुणे शहर चिटणीस लहू अण्णा बालवडकर, प्रकाश तात्या बालवडकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष समीर भाऊ चांदेरे, सागर बालवडकर, युवा मोर्चा पुणे शहर सरचिटणीस दुष्यंत मोहोळ, रोहन कोकाटे, विकास कामत यांच्यासह भाजपा महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..