May 1, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे विधाते वस्ती दत्तनगर येथिल नागरीकांच्या वतीने सीमा भिंत बांधण्यासाठी चांदेरे परिवाराच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा सत्कार..

बाणेर :

बाणेर, विधाते वस्ती भागातील दत्तनगर येथे पावसाळ्यात पुराचे पाणी वारंवार शिरते म्हणून मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नामुळे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित दादा पवार यांनी सिमा भिंत बांधण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला म्हणून बाणेर येथे समीर चांदेरे यांनी स्थानिक नागरिक यांची अजित दादांची भेट घालून दिली असता दत्त नगर मधील सर्व नागरिकांच्या वतीने स्थानिक नागरिक संतोष चवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित दादांचा सत्कार करत आभार मानले.

बाणेर, विधाते वस्ती भागातील दत्तनगर भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शिरले परिणामी आम्हा स्थानिकांची मोठी अडचण झाली, पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.बाबुराव चांदेरे साहेबांनी त्यावेळी स्थानिक रहिवाशांची भेट घेवून इथल्या सीमा भिंतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचा शब्द दिला होता. तो मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांना भेटून दत्तनगर परिसरातील कैफियत मांडली व येथील सिमा भिंतीचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला, यामुळेच आता उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी 5 कोटी रूपये निधी मंजूर करून दिला असून सिमाभिंतीचा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे.

विधाते वस्तीवरील दत्तनगर परिसरातील सीमा भिंतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच नागरिकांच्या प्रश्नासाठी कायम तत्पर असलेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मा. बाबुराव चांदेरे साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर अध्यक्ष समीर बाबुराव चांदेरे यांचे दत्तनगर भागातील नागरिकांच्या वतीने आभार मानण्यात येत आहे.

 

यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे, माणिक गांधीले उपस्थित होते.

You may have missed