November 21, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथे सौ. पूनम विधाते आयोजित ‘महिला उद्योजिका डिजिटल मार्गदर्शन कार्यशाळेला’ महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

बाणेर :

बाणेर येथे पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्याध्यक्ष आणि वामा वुमेन्स क्लब अध्यक्षा सौ पूनम विशाल विधाते यांच्या वतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील महिलांसाठी वामा वुमेन्स क्लबच्या माध्यमातून ‘महिला उद्योजिका डिजिटल मार्गदर्शन कार्यशाळा’ संपन्न झाली. या कार्यशाळेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आजच्या डिजिटल जमान्यात सोशल मीडिया च्या माध्यमातून आपला व्यवसाय कसा पुढे न्यायचा या विषयी मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली होती. असंख्य उद्योजिका, तरुणी, उद्योजिका होऊ पाहणाऱ्या सर्वानी या वर्कशॉप ला हजेरी लावली. यावेळी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे महिला आता विविध क्षेत्रात पुढे येत आहेत त्यांना गरज आहे ती तुमच्या आमच्या सहकार्याची. अनेक महिला छोट्या छोट्या कामांमधून स्वतःला सिद्ध करू पाहत आहेत पण त्यांना योग्य मार्गदर्शन, सहकार्य मिळत नाही. यासाठी वामा च्या माध्यमातून त्यांना त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी, सुरु करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. आज या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांनी अत्यंत सुंदरपणे आपले काम मांडले, पुढे जाण्याचा तो आत्मविश्वास प्रत्येक ‘ती’ मध्ये दिसत होता याचं खरंच समाधान आहे. सर्व महिला, सहकारी, मान्यवर यांचे मनापासून आभार !
– पूनम विशाल विधाते
(कार्याध्यक्ष : पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस / अध्यक्ष वामा वुमेन्स क्लब )

कमी वेळात आयोजन केलेल्या या कार्यशाळेला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. वामा टीम ने अतिशय उत्तम नियोजन केले. त्याच बरोबर सोशल मीडिया तज्ञ किमया बल्की यांनी अत्यंत सोप्या भाषेत सोशल मीडियाचं तंत्र महिलांना समजावून सांगितलं त्यासाठी आयोजकांनी त्यांचे आभार मानले.