May 8, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-पाषाण लिंक रोड वरील हॉटेल रानमळा परीसरात बंद असलेले पथदिवे जयेश मुरकुटे यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू..

बाणेर :

बाणेर-पाषाण लिंक रोड वरील हॉटेल रानमळा परिसरातील बंद अवस्थेतील पथदिवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाले. यामुळे या परीसरात नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

यासंबंधीचे पत्र आणि पाठपुरावा मी महानगरपालिकेकडे केला होता. पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. हा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे याचे समाधान वाटते.
– जयेश मुरकुटे (कार्याध्यक्ष, कोथरूड विधानसभा,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार))

जयेश मुरकुटे यांनी मागील अनेक महिन्यांपासून बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगे परिसरातील अनेक छोटे मोठे प्रश्न समस्या सोडविण्यावर भर दिला आहे.