बाणेर :
बाणेर येथील प्राईड प्लॅटिनम भागात विविध वस्तूंनी परिपूर्ण असलेल्या फ्ली मार्केटचे उद्घाटन सौ.सरलाताई बाबुराव चांदेरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
फ्ली मार्केटमुळे प्राईड प्लॅटिनम, बाणेर भागातील नागरिकांना विविध घरगुती आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंसह सौंदर्य प्रसाधने, कलाकुसरीच्या वस्तू, कपडे, चपला, दिवाळीसाठी लागणारे शोभेच्या वस्तू, वेगवेगळे कपडे , झाडे, शोभेच्या वस्तू जवळच्या जवळ उपलब्ध होऊन गरजूंना व्यवसाय मिळणार आहे.
बाणेर परीसरात व्यवसाय सुरू होऊन नागरीकांना विविध वस्तू खरेदी करण्याच्या सुविधा प्राप्त होतात म्हणून व्यवसायांना चालना मिळावी या हेतूने चांदेरे परिवार नेहमीच सहकार्य करतात.
यावेळी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रभाग अध्यक्षा सायलीताई शिंदे आणि परिसरातील नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी