पिरंगुट :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पिरंगुट शाखेतून दिनांक 23 व 25 सप्टेंबर रोजी तोरणा कुस्ती संकुल विंजर तालुका वेल्हा येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या पिरंगुट शाखेच्या इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
तोरणा कुस्ती संकुल विंजर तालुका वेल्हा मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत बऱ्याच विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यात पेरीविंकल स्कूल च्या पिरंगुट शाखेतील १७ वर्षीय खालील वयोगटात शिवम महाले यांनी सुवर्णपदक मिळवले व त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीने विभागासाठी त्याची निवड झाली. सतरा वर्षीय खालील वयोगटात मुलींमध्ये हर्षदा बलकवडे हिने ब्रॉन्झ पदक मिळवून यशस्वी झाली तर मिक्स बॉक्सिंग मध्ये आर्या खैरे हिने उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णपदक मिळवले. त्यांनी मिळवलेले हे यश खरोखरचं अद्वितीय बाब असून कौतुकाची व मेहनतीची मिळालेली थाप आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बांदल यांनी केले व सर्वांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सज्ज होण्यास प्रोत्साहित केले.
तसेच संचालिका सौ रेखा बांदल व मुख्याध्यापक अभिजित टकले सर यांनी त्याचे मनापासून अभिनंदन करत कौतुकाची थाप दिली. मुलांच्या यशामागे क्रीडा शिक्षक मणेरे हनुमंत यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..