April 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-बालेवाडी-सुस आणि म्हाळुंगे परिसरातील महिलांसाठी येणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी सौ. पूनम विधाते यांच्यावतीने गरबा वर्कशॉप चे आयोजन…

बाणेर :

बाणेर-बालेवाडी-सुस आणि म्हाळुंगे परिसरातील माता भगिनींसाठी येणाऱ्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने वामा वुमेन्स क्लबच्या वतीने सौ. पूनम विशाल विधाते यांच्या माध्यमातुन गरबा वर्कशॉप चे आयोजन शनिवार दिनांक 28 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 3 या कालावधीत मुरकुटे-विधाते वस्ती डीपी रोड येथिल स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृहामध्ये संपन्न होणार आहे.

 

भारतीय सण उत्सव परंपरेतील अतिशय लोकप्रिय नवरात्र उत्सव जवळ आला आहे. नवरात्रोत्सव आणि रास गरबा दांडिया हे समीकरण छान जुळते. भारतीय समूह नृत्य शैलीचा आविष्कार म्हणजे नवरात्र दांडिया. आपल्या परिसरातील माता-भगिनींना नवरात्रोत्सव मध्ये सामील होत आनंद उपभोक्ता यावा यासाठीच गरबा कसा खेळतात याची माहिती अवगत करता यावी व हा उत्सव अविस्मरणीय व्हावा म्हणून गरबा वर्कशॉप चे आयोजन केले आहे. तरी सर्व माता बहिणींनी या वर्कशॉप चा लाभ घेत नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज व्हावे
– सौ. पूनम विशाल विधाते ( अध्यक्ष : वामा वुमेन्स क्लब/कार्याध्यक्ष : राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहर)

वामा वुमेन्स क्लबच्या माध्यमातून अध्यक्षा सौ पूनम विधाते यांनी विविध प्रकारचे उपक्रम राबवत महिलांसाठी हक्काचे व्यासपी उपलब्ध करून दिले आहे. त्यांनी महिलांनी आपली संस्कृती जोपासत आनंदोत्सव कसा साजरा केला जावा यासाठी एक वेगळी दिशा दाखवली आहे. आपल्या परिसरातील महिलांना गरबा कसा खेळायचा या बद्दल जास्त माहिती अवगत नसते. हि माहिती वर्कशॉप च्या माध्यमातून उपलब्ध करून देत तो कसा खेळावा याचे प्रशिक्षण देऊन महिलांना नवरात्र उत्सवात सामील होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

गरबा वर्कशॉप मध्ये प्रशिक्षण देण्यासाठी गरबा नृत्य ट्रेनर निकिता सराफ आणि सुवर्णा कोटगिरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. गरबा वर्कशॉप मध्ये सामील होण्यासाठी संपर्क : 7768929900 / 7498031161 /9970470077