बालेवाडी :
बालेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलदादा उत्तम बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे गणेशोत्सवा निमित्त पर्यावरण पूरक कृत्रिम विसर्जन घाट तयार करण्यात आला होता. या घाटामुळे बालेवाडी परिसरातील नागरिकांनी तसेच बालेवाडीतील नावाजलेल्या लक्ष्मी माता गणपति मंडळ आणि अष्टविनायक मित्र मंडळ यांनी देखील गणपती विसर्जन केले.
नागरिकांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला असून तब्बल ११०० ते १२०० च्या जवळ जवळ नागरिकांनी या कृत्रिम विसर्जन घाटाचा गणेश विसर्जना साठी उपयोग केला.
गणेशमूर्तीची संख्या विचारात घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य व इतर कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी कृत्रिम विसर्जन हौदांची निर्मिती व निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली. पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी गणेश भक्तांनी नदी, नाला, ओढ्यात, विहिरीत मूर्ती विसर्जन करून पर्यावरणास हानी पोहोचवू नये या उद्देशाने हा विसर्जन घाट निर्माण केला होता. मोठया संख्येने गणेश भक्त नागरीक आणि बालेवाडी गावातील नावाजलेल्या मंडळांनी देखील या घाटाचा वापर करत आम्हाला सहकार्य केले : राहूलदादा बालवडकर (उपाध्यक्ष :- पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)
दरवर्षी हा कृत्रिम विसर्जन घाट आपण या ठिकाणी करण्यात यावा व खूप छान नियोजन या ठिकाणी राहुल दादा बालवडकर यांनी केले अशी प्रतिक्रिया नागरिकांन कडून मिळाली.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..