बाणेर :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) कोथरूड विधानसभेचे कार्याध्यक्ष श्री. जयेश संजय मुरकुटे यांच्या संकल्पनेतून आणि जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने माऊली गार्डन, बाणेर येथे तयार करण्यात आलेल्या पर्यावरण पूरक गणपती विसर्जन घाटाला बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण परिसरातील गणेश भक्तांनी व नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या गणेशोत्सवाच्या दरम्यान तब्बल ५७१ गणेश मूर्तींचे पर्यावरण पूरक आणि सर्व परंपरा जपत याठिकाणी विसर्जन केले. आरतीसाठी स्वतंत्र शेडची सोय, दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी पार्किंग सोय या ठिकाणी करण्यात आली होती. हा गणपती विसर्जन घाट पाहण्यासाठी आणि ते भेट देण्यासाठी परिसरातील मान्यवरांनी तसेच लहान मोठ्यांपासून सर्व लोकांनी मोठी गर्दी केली होती.
जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन होत आहे. यावर्षी या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच या उपक्रमाबद्दल जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..