September 19, 2024

Samrajya Ladha

भारती विद्या भवन परांजपे स्कूल कोथरूड च्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेत बाजी

आळंदी :

योग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने, महाराष्ट्र योग असोसिएशन आयोजित तसेच पुणे डिस्ट्रिक योग आणि फिटनेस इन्स्टिट्यूट व नारायणी एम्पॉवरिंग इंडिया फाउंडेशन यांच्या सौजन्याने राज्यस्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 ही स्पर्धा 14 व 15 सप्टेंबर रोजी करवा धर्मशाळा,आळंदी येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

महाराष्ट्राच्या 14 जिल्ह्यांमधून ही निवड चाचणी घेतली गेली. ह्या निवड चाचणीनंतर विविध जिल्ह्यातील पहिल्या 3 विजेत्या स्पर्धकांना हिमाचल प्रदेश येथे 24 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या देशस्तरीय योग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे.

यामध्ये पुण्यातील कोथरूड येथील भारती विद्या भवन,परांजपे विद्यामंदिर या शाळे मधील सहा स्पर्धकांनी पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. आळंदी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धे मध्ये परांजपे विद्यामंदिर शाळेच्या सर्वच्या सर्व खेळाडूंनी बाजी मारत हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या देशस्तरीय योग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

राज्यस्तरीय स्पर्धेत परांजपे विद्यामंदिर मधील विजेत्या खेळाडूंची नावे व वयोगट पुढीलप्रमाणे ;
– वयोगट 8 ते 10 मुले
– कौशल खासणीस प्रथम क्रमांक

– वयोगट 8 ते 10 मुली
– मेघना फुलसुंदर प्रथम क्रमांक
– आरोही कानडे द्वितीय क्रमांक

– वयोगट 10 ते 12 मुली
– अदिती तोरसकर द्वितीय क्रमांक
– अदिती माने तृतीय क्रमांक

– वयोगट 10 ते 12 मुले
– शिवराज अमित काळे तृतीय क्रमांक

वेगवेगळ्या वयोगटामधून सुमारे 350 खेळाडूं सदर स्पर्धेसाठी 14 जिल्ह्यातून सहभागी झाले होते. पुणे जिल्ह्यातून निवड झालेल्या सहा ही स्पर्धकांनी उत्कृष्ट प्रकारे योग सादर करून बाजी मारत ही उत्तुंग कामगिरी बजावली. या सर्व खेळाडूंना योग प्रशिक्षक संतोष रिंगणे यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.