November 22, 2024

Samrajya Ladha

बालेवाडी येथील साई मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती..

बालेवाडी :

बालेवाडी येथील साई मित्र मंडळ आयोजित कै. तेजस प्रदीप बालवडकर यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 72 रक्तदात्यांनी रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला आहे. या रक्तदान शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री मा.ना. चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत दादा पाटील, भाजपा महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्ष यांची उपस्थिती लाभली.

या शिबिराचे आयोजन सामाजिक बांधिलकी आणि लोकहिताच्या भावनेतून करण्यात आले होते. या उपक्रमामुळे रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर मदत मिळणे शक्य होईल, आणि त्यांचे प्राण वाचवण्यास मोठे योगदान मिळेल.

या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. रक्तदानाचे महत्व समजावून घेणाऱ्या या रक्तदात्यांचे कार्य अतुलनीय आहे. रक्ताची एक थेंबही अनमोल असतो, आणि हे दान भविष्यात अनेक जिवांना वाचवण्याचे साधन ठरू शकते. म्हणुनच मंडळाच्या वतीने राबविलेल्या रक्तदान शिबिराला विशेष महत्व आहे.