पाषाण :
पाषाण सूसरोड येथील विश्वकर्मा मित्र मंडळामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवत मुलांसाठी आणि महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आणि मान्यवरांच्या हस्ते श्रींची आरती घेण्यात आली.
मंडळाचे अध्यक्ष संजय आप्पा निम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेते :
१. बॉल थ्रो : प्रथम क्रमांक – रश्मी घारे
१.बॉल थ्रो : द्वितीय क्रमांक – राकेश चौधरी
२. होम मिनिस्टर : प्रथम क्रमांक – सुवर्णा निम्हण
२.होम मिनिस्टर : द्वितीय क्रमांक – उमा सुपेकर
३. रिंग राऊंड : प्रथम क्रमांक – सुजाता खराटे
४. ड्रॉइंग कॉम्पिटिशन : प्रथम क्रमांक – आराध्या
४.ड्रॉइंग कॉम्पिटिशन : द्वितीय क्रमांक – चंद्रिका चौधरी
विश्वकर्मा मित्र मंडळाच्या गणपती बाप्पाची आरती व बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी माजी नगरसेवक तानाजी निम्हण, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहुल दादा बालवडकर, अजय निम्हण, राहुल कोकाटे, संतोष गायकवाड, अशोक दळवी, नारायण चांदेरे, गोविंद कोकाटे, उत्तम जाधव, मारुती ससार, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब तारे आदी मान्यवर उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी