November 21, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथील दत्तनगर विधाते वस्ती परीसरात संरक्षण भिंत बांधण्यासाठी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा कडून निधी उपलब्ध, सौ. पूनम विधाते यांच्या पाठपुराव्याला यश..

बाणेर :

बाणेर येथील दत्तनगर विधाते वस्ती परीसरात पुराचे पाणी वारंवार घरात घुसल्याने नागरिकांचे हाल थांबणार असून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर कार्याध्यक्ष पूनम विशाल विधाते यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुराचे पाणी नागरी वस्ती मध्ये शिरू नये म्हणून संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच हे काम मार्गी लागून नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे.

याबाबत माहिती देताना पूनम विधाते यांनी सांगितले की, बाणेर येथील दत्तनगर विधाते वस्ती येथील नागरीकांना अनेक वर्षांपासून पावसाळ्यातील पुराच्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. पुराचे पाणी घरात शिरत असल्याने नागरीक हैराण होते. या समस्येची दखल घेत वस्तीतील लोकांसमवेत माननीय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कोथरूड चे आमदार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा यांच्याकडे संरक्षण भिंतीची मागणी केली होती.

अजितदादांनी या मागणीला त्वरित प्रतिसाद दिला आणि पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती पूनम विधाते यांनी दिली. त्या म्हणाल्या या उपाययोजनेमुळे दत्तनगर विधाते वस्तीतील नागरिकांना पावसाळ्यातील पुराचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही तातडीची आणि परिणामकारक कार्यवाही केल्याबद्दल अजितदादांचे व त्यांच्या टीमचे नागरीक आभार मानत आहे.