September 19, 2024

Samrajya Ladha

बाणेर परिसरातील विविध गणेश मंडळांनी देखाव्याच्या माध्यमातून आणि उपक्रमातून सामाजिक संदेश देत जपली सांस्कृतिक परंपरा : समीर चांदेरे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस)

बाणेर :

बाणेर येथे गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. सातव्या दिवसानंतर काही ठिकाणी विसर्जनाची सुरुवात देखील झाली आहे या संमिश्र उत्सवाच्या वातावरणात बाणेर येथील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी भेट देत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

बाणेर गावातील न्यू तुकाई माता मित्र मंडळाच्या वतीने केलेला सत्कार स्वीकारत भैरवनाथ मित्र मंडळाच्या वतीने राबवले जाणारे विविध सामाजिक उपक्रम तसेच देखाव्यामध्ये श्री राम मंदिराची उत्कृष्ट साकारलेली प्रतिकृती याची स्तुती करत मंडळाच्या वतीने वृक्ष देऊन केलेला सन्मान युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी स्वीकारला तसेच ॐ शिव शंभो मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिकेत विधाते आणि पदाधिकाऱ्यांनी साकार केलेल्या प्राचीन गणेश मंदिराची प्रतिकृती पाहुन श्रीं चे दर्शन घेतले.

नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवून अग्रेसर असलेले श्री शिव छत्रपती मित्र मंडळाच्या वतीने स्व.प्रतीक भाऊ भुजबळ यांच्या स्मरणार्थ यावेळी महिला भजन स्पर्धा आयोजित करत सामाजिक उपक्रमांची अखंड परंपरा सुरूच ठेवली आहे त्यांचे विशेष कौतुक. तर वक्रतुंड मित्र मंडळाला भेट देवून बाप्पांचे दर्शन घेतले, यावेळी अध्यक्ष चन्नू शहाबादे व पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या वतीने भेट म्हणून दिलेल्या नाविन्यपूर्ण तुळशीच्या रोपाचा स्वीकार केला.

दरवर्षी प्रमाणे परिसरातील नागरिकांसाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या राजा शिवछत्रपती मित्र मंडळाला चांदेरे यांनी भेट दिली, यावर्षी अध्यक्ष निशिकांत कळमकर आणि पदाधिकाऱ्यांनी संगीतखुर्ची, नृत्यस्पर्धा, भजन -अभंग गायन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करत नागरिकांनाचा उत्साह वाढविला त्यांना प्रोत्साहन दिले.

५४ वर्षांची परंपरा असलेल्या विधाते वस्ती येथील नेहरू मित्र मंडळाला देखील भेट दिली, यावर्षी मंडळाच्या वतीने अतिशय देखणी अशी भगवान श्री अमरनाथ मंदिराची प्रतिकृती साकार केली आहे. तर दर्शन पार्क मित्र मंडळाने भगवान श्री कृष्णाने कालिया नागाच्या डोक्यावर केलेल्या नृत्याचा सुरेख देखावा सादर केला या दोन्ही मंडळांना भेटी देवून सुंदर देखाव्यांची पाहणी करुन श्रींचे दर्शन केले.

तसेच बाणेर भागातील जय महाराष्ट्र मित्र मंडळ, जयभवानी मित्र मंडळ, न्यू वक्रतुंड मित्र मंडळ, शिवराज मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ अशा मंडळांना भेट देवून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि गणेश भक्तांशी संवाद साधला.

राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बाणेर मधील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेचे देखील आयोजन केले, या मोहिमेला प्रभागातील महिलांनी उदंड प्रतिसाद देत लाडकी बहीण योजनेला समर्थन दिले.

गौराईंचे विसर्जन झाले की मग सार्वजनिक गणपती मंडळांनी केलेले देखावे आणि सजावट बघायला अनेक नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. गणेशोत्सवाचा ७ दिवस म्हणजे अनेकांच्या घरच्या आणि सार्वजनिक मंडळांच्या गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा देखील असतो. काल आमच्या प्रभागातील अनेक ठिकाणी भेटी देत असताना नागरिकांचा प्रचंड उत्साह जाणवला. गणेशोत्सव मंडळाने उभे केलेले विविध देखावे आणि राबविलेले उपक्रम यामुळे आपल्या प्रभागातील विविध मंडळांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक आगळा वेगळा सामाजिक संदेश नागरिकांना दिला : समीर चांदेरे (युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)