पाषाण :
पाषाण येथील कोकाटे तालीम मंडळ ट्रस्ट आयोजीत स्व. नंदकुमार कोकाटे व स्व. निलेश कोकाटे यांचा स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया शिबीरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या वेळी आवश्यकतेनुसार मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिराला 250 नागरिकांचे नेत्र तपासणी करुन चष्मे वाटप करण्यात तर 57 लोकाचे मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया मोफत करुन दिली जाणार आहे.
कोकाटे तालीम मंडळ ट्रस्टच्या वतीने मोठे उत्साहात दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील विविध उपक्रमातून गणेशोत्सव मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा होत आहे. मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम यावर्षी देखील राबविले जात आहे.
यावेळी रोहन कोकाटे, सुरेश कोकाटे, भास्कर कोकाटे, दत्ता कोकाटे, सौरभ कोकाटे, संग्राम कोकाटे, ओंकार कोकाटे, पांडूरंग कोकाटे, शिवाजी कोकाटे, नारायण कोकाटे, संतोष कोकाटे, वासुदेव आमले, सोमनाथ ववले, विवेक कोकाटे, सागर कोकाटे, तुषार भिसे, नवनाथ ववले आदि मान्यवर उपस्थित होते.
More Stories
“बाप्पा मोरया! सर्जनशीलतेचा जयघोष” – पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गणेश मूर्ती वर्कशॉप
बालेवाडी येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून स्मार्ट मीटरच्या फायद्याबद्ल माहिती आणि पायाभूत सुविधांचे वेळेवर देखभाल करून वीजपुरवठा सुधारण्याचे आश्वासन
सोमेश्वरवाडी, पाषाण, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे या परिसरातील नागरिकांसाठी सचिन दळवी यांच्या वतीने घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन…