September 19, 2024

Samrajya Ladha

औंध आयटीआय येथे आज संविधान मंदिराचे चे उद्घाटन होणार…

औंध :

दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध पुणे येथे संविधान मंचाची निर्मिती केलेली आहे सदर संविधान मंदिराचे चे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या शुभहस्ते ऑनलाईन म्हणजेच आभासी पद्धतीने होणार आहे सदर उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माननीय अजित दादा पवार तसेच कौशल्य, रोजगार ,उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र चे मंत्री मा श्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडणार आहे.

तसेच संविधान मंदिर महाराष्ट्रातील एकूण 434 आयटीआय मध्ये तयार करण्यात आलेला आहे. त्यातील एक औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे तयार करण्यात आले असून त्या संविधान मंदिराचे उद्घाटन दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ११:०० वाजता पुणे जिल्ह्यातील खासदार मा श्री मुरलीधर मोहोळ , आमदार मा श्री सिद्धार्थ शिरोळे ,स्थानिक नगरसेवक , विविध संघटनेचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.

तसेच या उद्घाटन प्रसंगी औंध परिसरातील स्थानिक नागरिक व प्रशिक्षणार्थी व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनाही या सोहळ्यास उपस्थित राहता येईल असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक तथा पुणे विभागाचे प्रभारी सहसंचालक रमाकांत भावसार यांनी आव्हान केले आहे.