बाणेर :
श्री शिवछत्रपती मित्र मंडळ, वरची आळी बाणेर वतीने स्व. प्रतीक भाऊ भुजबळ यांच्या स्मरणार्थ विशेष निमंत्रित महिला बचत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ खासदार आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष व महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्याध्यक्ष पूनम विधाते यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत खासदार सुनील तटकरे आणि रूपालीताई चाकणकर यांनी गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
श्री शिवछत्रपती मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या भजन स्पर्धेचा निकाल :
१.प्रथम क्रमांक विभागून : विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ कोंढवा बुद्रुक आणि विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ बालेवाडी.
२.द्वितीय क्रमांक : राधाकृष्ण भजनी मंडळ काळेवाडी
३.तृतीय क्रमांक : पसायदान भजनी मंडळ सुतारवाडी
वैयक्तिक बक्षिसे :
उत्कृष्ट हार्मोनियम : श्री.सावता माळी भजनी मंडळ
उत्कृष्ट मृदुंग वादन : सखाराम जाधव
उत्कृष्ट गायिका : प्रतीक्षा तोडकर
उत्कृष्ट तबला : केदार कुलकर्णी



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी