बालेवाडी :
बालेवाडी गावठाण ते विसर्जन घाट या रस्त्याची अवस्था फार बिकट झाली होती. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुरावअप्पा चांदेरे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांच्या प्रयत्नातून संपूर्ण रस्ता डांबरीकरण करण्यात आला.
गेल्या अनेक दिवसापासून बालेवाडी गावठाण ते विसर्जन घाट या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली होती. नागरिकांना या रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. हा रस्ता चांगला व्हावा अशी ग्रामस्थांची इच्छा होती. गणेशोत्सवाचा काळ लक्षात घेता या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन तात्काळ आमचे मार्गदर्शक बाबुरावअप्पा चांदेरे यांच्या सहकार्याने रस्त्याचे डांबरीकरण करून घेतले : राहुल बालवडकर (उपाध्यक्ष: पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)
या रस्त्याचे काम झाल्याने ग्रामस्थांनी आणि गणेश मंडळांनी समाधान व्यक्त केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन घाटापर्यंत जाण्याकरता नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी