बावधन :
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बावधन येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.विद्यार्थ्यांनी नृत्यकलेतून आपला आविष्कार सादर केला. तसेच शिक्षकांप्रती आदर अपल्या भाषणातून दाखवून दिला.विद्यार्थी शिक्षक बनून क्लास मध्ये गेले. यावेळी शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षक आपल्या आयुष्याचा आधारस्तंभ आणि मार्गदर्शक असतात. शिक्षकांकडून मुलांवर आई-वडिलांसारखे संस्कार केले जातात. एवढेच नव्हे प्रत्येक मुलामधील कौशल्य पाहून त्याला त्यानुसार आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवला जातो. ज्याप्रकारे मातीपासून भांडी अथवा कलाकृती तयार करण्याचे काम कुंभार करतो त्याचप्रमाणे शिक्षकांचे आपल्या आयुष्याला कलाटणी लावण्यासाठी फार मोठे योगदान असते असे मत कार्यक्रमाचे पाहुणे योगेश पाटेकर यांनी व्यक्त केले. शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी आयुष्यात यशाच्या मार्गाने घेऊन जातात.
यावेळी प्रमुख पाहुणे NKGSB बँकेचे मॅनेजर योगेश पाटेकर, झोनल मॅनेजर प्रसाद वर्पे, पेरिविंकल समुहाच्या डायरेक्टर सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल उपस्थित होते. भारतात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षकांचे त्या-त्या क्षेत्रातील योगदान, त्यांनी घडवलेले विद्यार्थी, त्यांचे या समाजाप्रति असलेले महत्त्वाचे योगदान या सर्वांबद्दल कृतज्ञता म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो.राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान हे फार मोलाचे आहे. एक सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती.चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ. रेखा बांदल यांनी यावेळी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रिया लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका इंदू पाटील, कल्याणी शेळके व शिक्षक वृंद यांनी पाहिले. तसेच सूत्रसंचालन निमिषा कुलकर्णी व तनुश्री देबनाथ यांनी केले.
More Stories
बाणेर-बालेवाडी-सुस आणि म्हाळुंगे परिसरातील महिलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित गौरी सजावट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न…
सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
पाषाण येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमोद निम्हण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..