November 21, 2024

Samrajya Ladha

पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रत्येक विधानसभा क्षेत्रात “युवा संवाद” कार्यक्रम राबविणार : पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे

पुणे :

राष्ट्रवादी युवक काँग्रेस-पुणे शहराची आज संघटनात्मक आढावा बैठक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.सूरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमधे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.

पुणे शहर अध्यक्ष मा.दीपकभाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात संघटनेची बांधणी झाली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक विधानसभेत मोठया प्रमाणात नोकरी मेळावे देखील झाले ज्यातुन हजारो युवकांना नोकऱ्या मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात यश मिळाले. युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी सूत्रे हातात घेतल्यापासून युवकांना एकत्रित करत सामावून घेत पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोठया उत्साहात कामाला लागली असून युवकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता युवक संघटन अधीक मजबूत होताना दिसते आहे.

या बैठकीची माहिती देताना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी सांगितले की, युवकांची मोठ बांधत युवक संघटनेच्या वाढीसाठी मतदारसंघनिहाय शाखा लोकार्पणाचे कार्यक्रम हाती घेतले असुन येत्या काही दिवसात जास्तीत जास्त युवक शाखा सुरु करण्याचे लक्ष आहे. युवक संघटन मजबूत करण्याचा दृष्टिकोनातून पुणे शहरात प्रत्येक विधानसभेत युवक संघटनेची कार्यकारिणी जाहिर केली असून स्वतंत्र मेळावे घेत कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम सुरू आहे.

युवक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात झालेल्या युवा मिशन कार्यक्रमात पुणे शहर युवक कार्यकारिणीने आणि कार्यकर्त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळत कार्यक्रम यशस्वी केला याबद्दल युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी कार्यकर्त्यांची स्तुती केली.

पुणे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लवकरचं अजितदादांच्या प्रमुख उपस्थतीमधे युवक मेळावा घेणे, युवकांना आर्थिक दृष्ठ्या सक्षम करण्यावर भर देण्यासाठी कृतीकार्यक्रम हाती घ्यावा, शहरातील व्यापारी बांधवांना अतिक्रमणाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या त्रासावर तोडगा काढावा, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात “युवा संवाद” कार्यक्रम राबवावा, गणेशोत्सवाच्या काळात लाडकी बहीण योजनेबाबत जनतेतून फीडबॅक घेवून सह्यांची मोहीम राबवावी, असे वेगवेगळे ठराव आणि निर्णय आजच्या आढावा बैठकीत झाले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष राकेश कामठे, शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अभिषेक भाऊ बोके, युवक कार्याध्यक्ष अब्दुल हाफीज, मनोज बालवडकर, अच्युत लांडगे, मनोज पाचपुते, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत कडू, विधानसभा प्रमुख मोहित बराटे, प्रसाद चौगुले, अजय साबळे, इंद्रसेन काकडे,उन्मेष काळभोर,गजानन लोंढे, श्रीधर लोंढे, कुलदीप शर्मा,सागर कोल्हे, गणेश झांबरे, निरीक्षक निखिल शर्मा, सुरज गायकवाड, ऋषिकेश थोरवे, विनोद सकट, सागर चंदनशिवे, सचिन विंचवेकर, विशाल चौगुले तसेच पुणे शहर युवकचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.