May 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील बाणेश्वर मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त पुणे महापालिका आयुक्तांनी घेतले दर्शन..

बाणेर :

बाणेर येथील प्रसिद्ध पांडवकालीन गुफा मंदिर म्हणजेच बाणेश्वर मंदिर येथे शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांसोबत पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंदिरातील बाणेश्वराचे दर्शन घेतले.

 

यावेळी बाणेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने महापालिका आयुक्त यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मंदिराची ऐतिहासिक माहिती सांगण्यात आली. यावेळी मंदिराच्या परिसरात होणाऱ्या विकास कामाची माहिती देण्यात आली. आयुक्तांनी तुकाई टेकडीला जाऊन तुकाई देवीचे दर्शन घेतले.

पांडवकालीन ऐतिहासिक मंदिर अतिशय सुंदर असून श्री बानेश्वर देवाच्या दर्शनाचा लाभ आज भेटला. मंदिराच्या परिसराची भक्तिमय वातावरण पाहून मनाला समाधान लाभले. मंदिराच्या वतीने देवस्थानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात ही समाधानाची बाब आहे
–  राजेंद्र भोसले(आयुक्त पुणे महानगरपालिका)

सोमवती अमावस्या व शेवटचा सोमवार असल्याने बाणेश्वर मंदिराच्या पिंडीला नंदी स्वरूपात शृंगार करण्यात आला होता. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये लाखो विविध कार्यक्रम घेण्यात आले. सुमारे दिड ते दोन लाख भाविकांनी श्रावण महिन्यामध्ये दर्शनाचा लाभ घेतला.

याप्रसंगी बाणेश्वर देवस्थान ट्रस्टचे संदीप वाडकर, सुधीर कळमकर, गणेश तापकीर आदी उपस्थित होते.