बाणेर :
बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, सूस परिसरातील सोसायट्यांसाठी वामा वुमन्स क्लब अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला कार्याध्यक्ष यांच्या वतीने वामा वुमन्स क्लब प्रस्तुत ‘वामा डान्स फेस्ट’ आंतर सोसायटी ग्रुप डान्स स्पर्धा चे आयोजन रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी पंडित भीमसेन जोशी कला मंदिर औंध येथे आयोजित करण्यात आले आहे.
डान्स फेस्ट म्हणजे कलागुणांना वाव देण्याची संधी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच नृत्याची हौस असते. या माध्यमातून आपले छंद जोपासत आनंद घेतला जातो. हीच संधी वामा डान्स फेस्ट तुमच्यासाठी घेऊन येत आहे. बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, सूस परिसरातील सर्व नृत्यप्रेमींसाठी आंतरसोसायटी ग्रुप डान्स स्पर्धांचं आयोजन केले आहे. सर्व वयोगटासाठी हि स्पर्धा असून हि स्पर्धा मोफत असणार आहे. दिलेल्या QR कोड वर स्कॅन करून गुगल फॉर्म भरून लवकर नोंदणी करून स्पर्धेचा मनसोक्त आनंद घ्यावा : सौ. पूनम विशाल विधाते (अध्यक्ष : वामा वुमन्स क्लब/कार्याध्यक्ष: राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर)
वामा डान्स फेस्ट
रविवार, २९ सप्टेंबर २०२४
ठिकाण- पंडित भीमसेन जोशी कलामंदिर, औंध
ग्रुप डान्स स्पर्धेसाठी नियम व अटी :
१. ग्रुप डान्स साठी कमीत कमी ८ व जास्तीत जास्त १४ स्पर्धक असावेत.
२. ही स्पर्धा सर्व सोसायटी धारकांसाठी असून यामध्ये प्रत्येक सोसायटीतून एक वयोगटातून एकच एंट्री घेण्यात येईल.
३. गाणे कमीत कमी तीन मिनिटे आणि जास्तीत जास्त चार मिनिटांचे असावे, त्यापेक्षा मोठे गाणे झाले तर तो ग्रुप बाद करण्यात येईल
४. ही स्पर्धा सोलो डान्स साठी नसून फक्त ग्रुप डान्स साठी खुली आहे.
५. या स्पर्धेचा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
६. नाश्ता आणि चहा स्पर्धकांना दिला जाईल
७. निवडलेले गाणे पेन ड्राईव्ह मध्ये mp3 फॉरमॅट मध्ये द्यावे.
८. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
९. प्रत्येक वयोगटासाठी एक इंट्री घेतली जाईल.
ग्रुपचे वयोगट :
७ वर्ष ते १३ वर्ष (ग्रुप १)
१४ वर्ष ते २१ वर्षे (ग्रुप २)
२२ वर्षे ते ४५ वर्षे (ग्रुप ३)
४५ पासून पुढे (ग्रुप ४)
अधिक माहितीसाठी संपर्क : ८४४६८८८८०२,९६०७४५४५००
More Stories
बाणेर-बालेवाडी-सुस आणि म्हाळुंगे परिसरातील महिलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित गौरी सजावट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न…
सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
पाषाण येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमोद निम्हण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..