September 12, 2024

Samrajya Ladha

बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचा 26 वा वर्धापन दिन मोठया उत्साहात संपन्न..

बाणेर :

बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘भैरवनाथ सन्मान’ गौरव पुरस्कार सोहळा
संपन्न झाला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्यानिमित्त हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे प्रबोधनपर कीर्तनही कुंदन गार्डन मंगल कार्यालय बाणेर येथे झाले. यावेळी मानसिक आरोग्य व ध्यान साधना प्रकाशन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

प्रस्तावनेमध्ये बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक डॉ.दिलीप मुरकुटे यांनी संस्थेच्या प्रारंभापासून तर मागील 26 वर्षात संस्थेने केलेल्या कामाचा आढावा सांगितला. संस्थेने अतिशय बिकट परीस्थितीमधून खंबीरपणे यशस्वी वाटचाल करत 26 वर्ष पुर्ण करत आहे याचे समाधान वाटते. तसेच बँकिंग क्षेत्राबरोबरच संस्थेने सामाजिक उपक्रम देखिल राबविले आहेत.

यावेळी आपले विचार व्यक्त करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, जिथे विचार संपतात तिथे माणसे विखारी बनतात म्हणून जीवनात विचार महत्त्वाचा असतो. एकवेळ आपण समाजाच्या नजरेतून पडलो तरी चालेल परंतु स्वतःच्या नजरेतून पडलो तर यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. माणूस नम्र‌ विनयशील असावा तसेच जेव्हा माणूस तृष्णामुक्त होतो तेव्हा दु:खातून मुक्ती मिळते. डॉ. दिलीप मुरकुटे यांनी नेहमीच ‘बँकिंग क्षेत्राबरोबरच समाजाभिमुख काम करत विविध गरजूंना नेहमीच मदतीसाठी बाणेर नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमात अग्रेसर असतात. पतसंस्थेचे उपक्रम कौतुकास्पद आहेत असे त्यांनी बोलतांना सांगितले.

यावेळी इसेंशिया हाईट सोसायटी महाळुंगे यांना आरोग्य पुरस्कार, श्री सारथी सोव्हेनीर सोसायटी महाळुंगे यांना आदर्श सोसायटी पुरस्कार, राकेश विटकर (सुरक्षा अधिकारी पुणे महापालिका) यांना सामाजिक पुरस्कार, लोकेश पाडळे, संतोष पाडाळे, श्रीमती भारती गायकवाड, डॉ. तेजस्विता सावंत, सुषमा भावसार, गीता भावसार, प्रसाद टकले यांना ‘भैरवनाथ सन्मान’ गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी शंकर मांडेकर (जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, बाळासाहेब चांदेरे(जिल्हाप्रमुख शिवसेना), पृथ्वीराज सुतार (गटनेते शिवसेना), माजी नगरसेवक ज्ञानेश्र्वर तापकीर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, हभप पांडुरंग अप्पा दातार, अशोक मुरकुटे, ॲड.पांडुरंग थोरवे, बाळासाहेब भांडे, गणपत मुरकुटे, नारायण चांदेरे, जयेश मुरकुटे, जीवन चाकणकर, संग्राम मुरकुटे, मयूर भांडे, पतसंस्थेचे अध्यक्ष राजू शेडगे, उपाध्यक्ष संजय ताम्हाणे, शाखा अध्यक्ष वृषभ मुरकुटे, पिरंगुट शाखा अध्यक्ष राम गायकवाड, माजी चेअरमन युवराज मुरकुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपलक्ष्मी बेळगावकर, गणेश मुरकुटे, ॲड. दिलीप शेलार, किरण मुरकुटे, प्रकाश बालवडकर, संतोष तोंडे, महेश सुतार, नाना वाळके, रखमाजी पाडाळे, सोपानराव पाडाळे, अविनाश गायकवाड, ॲड विशाल पवार, वसंत चांदेरे, अतुल अवचट, भानुदास पाडाळे, जंगल रणवरे, योगेश गायकवाड, प्रल्हाद मुरकुटे, सुखदेव रणवरे माणिक रायकर, संतोष भोसले, दत्ता शेटे, रवींद्र शेळके, युवराज मुरकुटे, नामदेव भेगडे, तसेच संस्थेचा कर्माचारी, सभासद आणि विविध राजकिय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते.