September 12, 2024

Samrajya Ladha

पेरीविंकल –  पिरंगुट कडून सर्वच क्रीडाक्षेत्र पादाक्रांत !सार्थक कुडलेने तायक्वांदो मधे मिळवले सुर्वण पदक !!!

पौड :

शनिवार  दिनांक ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या तालुकास्तरीय तायक्वांदो  स्पर्धेमध्ये चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या पिरंगुट शाखेच्या इयत्ता दहावीचा विद्यार्थी सार्थक कुडले याने सतरा वर्षीय वयोगटात सुवर्णपदक पटकावले. याच वयोगटातील अथर्व पाटील, धीरज कांबळे, संग्राम गराडे, फायजा शेख, सोहम कदम, अनुष्का येवले, अंतरा रायरीकर, या विद्यार्त्यांने रजतपदक मिळवले. १४ वर्षे वयोगटात प्रांजल मिश्राने रजत पदक प्राप्त केले.

 

पौड येथे नुकत्याच पार पडलेल्या तायक्वांदो स्पर्धेत एकूण १५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यात सार्थक याने सुवर्ण, आणि अथर्व पाटीलने रौप्य पदक मिळवले.  यांना मिळालेले पदक पेरीविंकलसाठी मानाचा तुराच म्हणावे लागेल.   

माननीय अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या संचालिका रेखा बांदल व मुख्याध्यापक डॉ. अभिजीत टकले सर यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले.  क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वच क्रीडा प्रकारात पेरिविंकल स्कूलने मिळवलेले अव्वल स्थान हे संचालक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी या सर्वांचे एकत्रित यश आहे.