November 21, 2024

Samrajya Ladha

सुस शाखेतील पेरिविंकल स्कूल ची स्वराली चोपडे ठरली तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्पदक विजेती !!!

पौड :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सूस शाखेतून शनिवार दिनांक 31/ 8/2024 रोजी पौड येथे झालेल्या तालुका स्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सुस शाखेची इयत्ता दहावीची स्वराली चोपडे हिने १७ वर्षीय वयोगटात 46 किलो वजन गटामध्ये बाजी मारून सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे.

गोल्ड मेडल म्हणजेच सुवर्णपदक पटकावून स्वरालीची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ही खरोखरच खूप आनंदाची व अभिमानाची बाब आहे असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांनी केले.

पौड येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत एकूण 300 च्या वर विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यात स्वराली हीने पटकावलेले सुवर्णपदक ही खरोखरच कौतुकाची व मेहनतीची मिळालेली थाप असून शाळेसाठी अतिशय गौरवाची बाब आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल यांनी केले व शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सज्ज होण्यास प्रोत्साहित केले.

तसेच संचालिका सौ रेखा बांदल व मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांनी त्याचे मनापासून अभिनंदन करत कौतुकाची थाप दिली.

पेरिविंकल स्कूल हे केवळ अभ्यासात नव्हे सर्वच क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवतात हे यावरून सिद्ध होते . संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर संचालिका रेखा बांदल तसेच मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांचे नेहमीच विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही प्रोत्साहन असते त्यामुळेच पेरिविंकल चे हिरे चमकतात असे शिक्षवृंद व पालकांनी नमूद केले.

या संपूर्ण विजयाचे व सुवर्णपदक प्राप्तीचे श्रेय हे स्वरालीच्या च्या मेहनतीला व तिचे शाळेतील क्रीडा शिक्षक ज्यांनी तिला भाग घेण्यास प्रोत्साहित करुन खेळासाठी पौड येथे स्वतः जातीने उपस्थित राहून प्रोत्साहित केले असे ज्ञानेश्वर मोरे सर , HOD सचिन सर , नेहा माळवदे व पालक आणि वर्गशिक्षक या सर्वांना जाते असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी अभिनंदन करताना सांगितले.