November 22, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथे नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून जागर श्री सामर्थ्याचा प्रबोधन आणि मनोरंजन पर ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन..

बाणेर :

भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ यांच्यावतीने उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सानेवाडी, सूस, महाळुंगे परिसरातील महिला भगिनींसाठी ‘जागर स्त्री सामर्थ्याचा प्रबोधन आणि जागर’ या कार्यक्रमाचे रविवार दिनांक १ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

गेली पाच वर्षे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातुन महिलांना विशेष प्राधान्य देत महिला सबलीकरण आणि बचत गट यांना ताकत देण्याचे काम केले आहे. याच अनुषंगाने खास महिलांसाठी ‘जागर स्त्री सामर्थ्याचा प्रबोधन आणि जागर’ या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत दादांच्या माध्यमातुन भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ महिला आघाडीच्या सुजाता संतोष धनकुडे, हर्षदा अविनाश थिटे, सुमन रामस्वरूप रेडवाल यांच्यावतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांमध्ये खास महिलांसाठी विशेष आकर्षण म्हणून महाराष्ट्राचे लाडके भाऊजी किरण पाटील यांचा ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात आकर्षक बक्षीसे आणि लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची आकर्षक पारितोषिके :
१.प्रथम क्रमांक – फ्रिज
२.द्वितीय क्रमांक – एलईडी टीव्ही
३.तृतीय क्रमांक – ओव्हन
४.चतुर्थ क्रमांक – मिक्सर
५.पाचवा क्रमांक -डिनर सेट

तसेच लकी ड्रॉ द्वारे मानाची पैठणी आणि सोन्याची नथ भेट दिली जाणार आहे. तसेच उपस्थित असणाऱ्या प्रत्येक महिला भगिनींना आकर्षक भेटवस्तू देखील दिली जाणार आहे.

रविवार दिनांक १ सप्टेंबर रोजी
स्थळ : माऊली गार्डन मंगल कार्यालय, बाणेर
वेळ : २ ते ६