November 21, 2024

Samrajya Ladha

जनवानी पुणे संघटनेने गौरवले पेरिविंकल बावधन स्कूल…

पुणे :

कमिंस इंडिया फाउंडेशन, जनवानी इको वेस्ट अंतर्गत 2023-24 मध्ये आयोजित केलेल्या ई वेस्ट व प्लास्टिक संकलन जनजागृती  मध्ये पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधनने उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या उपक्रमांतर्गत पेरीविंकल स्कूल बावधनला मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या उपक्रमामध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण 80 शाळांचा सहभाग होता व या शाळांमधून पेरिविंकल स्कूलने ट्रॉफी पटकावून पुन्हा एकदा अभिमानाचा झेंडा रोवला.

या उपक्रमाचा उद्देश समाजामध्ये ई-वेस्ट व प्लास्टिक संकलन विषयी जनजागृती करणे व शाळेतील विद्यार्थ्यांना या विषयी माहिती देऊन त्यांच्या मनातही समाज भावना जागृत करणे हा होता. देशातील कचऱ्याचा सर्वात वेगाने वाढणारा प्रवाह. शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया न केल्यास विषारी आणि घातक परिणाम होतात. या प्रकल्पात, कमिन्स आणि पीएमसीचे संघ ई-कचऱ्याची पर्यावरणपूरक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी अधिकृत पुनर्वापर करणाऱ्यांसोबत काम करत आहेत. कमिन्सच्या स्वयंसेवकांनी शहरातील शाळा, गृहनिर्माण संस्था आणि कॉलेजमध्ये ई-कचरा प्रदूषण आणि पुनर्वापराची गरज याबाबत जनजागृती केली. चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ. रेखा बांदल यांनी यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली.

या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रिया लढ्ढा, स्वाती कोल्हे पर्यवेक्षिका इंदू पाटील, कल्याणी शेळके व शिक्षकवृंद यांना जाते.