बाणेर :
बाणेर येथील सौ पूनम विशाल विधाते यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर महिला कार्याध्यक्षपदी निवड झाली. तसे नियुक्ती पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. महिला सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी सतत देत असलेल्या योगदानाची पक्षाने दखल घेत विधाते यांना मोठी जबाबदारी दिली आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुणे शहर महिला कार्याध्य्क्ष पदी माझी निवड झाली. खरंतर समाजासाठी काम करत असताना आपण पूर्णपणे झोकून देऊन काम करत असतो. लोकांना भेटत असतो, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्यप्रकारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण सामाजिक कामाला राजकीय किनार असेल तर कामांचा वेग दुपटीने वाढतो हा आजवर मी घेतलेला अनुभव आहे. आज महिलांसाठी महिलांचे प्रश्न मांडताना महिलांना सक्षम करण्यासाठी आपण पहिली सुरवात स्वतःपासूनच करायला हवी असं वाटतं. आज खऱ्या अर्थानं एक पाऊल पुढे जात एक नवीन आव्हानं, नवीन जबाबदारी घेत समाजपयोगी कामे करणार आहे : सौ.पूनम विशाल विधाते(कार्याध्यक्ष : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर महिला कार्याध्यक्ष पदी नेमणूक केल्याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, मा. प्रफुल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष मा. सुनील तटकरे साहेब, महिला व बालकल्याण मंत्री मा. अदितीताई तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष मा. रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रिया गदादे यांचे मनःपूर्वक आभार सौ.पूनम विधाते यांनी मानले.
More Stories
बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे येथील सोसायटी मित्र परिवाराच्या वतीने समीर चांदेरे यांच्या वाढदिवसानिमित्त हाउसकीपिंग, सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना ‘चार्जिंग लाईट्स’ आणि मिठाई वाटप करत राबविला सामाजिक उपक्रम..
बाणेर, बालेवाडी, सुस व म्हाळुंगे येथील इयत्ता १० वी व १२ वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न…
दगडूशेठ मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारणाऱ्या पेरिविंकल स्कूलच्या सूस शाखेने राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पटकावला तिसरा क्रमांक!!!