बालेवाडी :
बालेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांच्या वतीने कैलासवासी सौ. ताराबाई बाजीराव बालवडकर यांच्या स्मरणार्थ गरीब गरजु मुलांना मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन ह.भ.प भगीरथजी महाराज काळे सिन्नर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
सध्याचा काळ हा संगणकीय काळ असून येणाऱ्या प्रत्येक पिढीला संगणक प्रशिक्षण फार महत्त्वाचे झाले आहे. परंतु अजूनही परिसरातील बऱ्याच विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे संगणक प्रशिक्षण घेता येऊ शकत नाही म्हणून येणाऱ्या काळातील संगणकाचे वाढते महत्त्व लक्षात घेत विशेष करून परिसरातील वाडी वस्तीतील, गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता यावा हा उद्देश असून विविध भागात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे, तसेच प्रशिक्षणार्थींना व्यावसायिक संधी व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची आमची योजना आहे. : राहुल बालवडकर(उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)
यावेळी अशोक नवल, हभप संजय बापू बालवडकर, मा. सरपंच नारायण चांदेरे, मोरेश्वर बालवडकर, ॲड.विजयजी मालू, ॲड.मशाळकर, ह.भ.प संतोष बालवडकर, श्री.प्रशिलजी अग्रवाल, डॉ. निलेश राठी, श्री.श्रीकांत चिटणीस, श्री.विकास जोशी, श्री.सुधीर अलकरी, श्री. किशोरजी वैद्य, श्री.चंद्रकांत जाधव, रिणा कश्यप, श्री. गणेश भुजबळ, श्री.प्रकाशजी बोकिल, श्री.गिरीधर राठी, प्रीती सिंह, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..