April 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

वामा वुमन्स क्लबच्या अध्यक्षा सौ. पुनम विधाते यांच्या वतीने आयोजित सौंदर्य ‘ती’ चं आत्मविश्वास ‘ती’ चा मेक-अप कार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

बाणेर :

बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे येथील महिलांसाठी वामा वुमन्स क्लबच्या अध्यक्षा सौ. पुनम विधाते यांच्या वतीने सौंदर्य ‘ती’ चं आत्मविश्वास ‘ती’ चा मेक-अप कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस २०० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मेक अप आर्टिस्ट सोनाली पवार यांच्या मार्फत माहिती प्राप्त केली.

 

वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारच्या उपक्रमातून व्यासपीठ निर्माण करत आहोत. प्रत्येक महिलेला आपले सौंदर्य अधिक चांगले असावे याची आवड असते. त्यासाठी आवश्यक मेक अप कसा असावा हे जाणून घेण्याचे कुतूहल असते. मेक अप छान असला की महिलांचा आत्मविश्वास कमालीचा उंचवलेला असतो. यासाठी साध्या सोप्या पद्धतीने सोपा मेक अप आणि समारंभ लूक कमी वेळेत कसा करायचा याची माहिती कार्यशाळेमार्फत देण्यात आली. महिलांनी देखील मोठ्या आवडीने मेक अप बद्दल माहिती जाणून घेतली : सौ. पूनम विशाल विधाते(अध्यक्ष: वामा वुमन्स क्लब)