बावधन :
पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बावधन येथे शनिवार दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी पिंपरी चिंचवड विभागातील हिंजवडी येथील दामिनी पथक महिला व बाल सुरक्षा प्रशिक्षणासाठी तैनात केले गेले. शहरातील बहुतेक शाळा व महाविद्यालयात विद्यार्थिनी साठी सुरक्षिततेचे वातावरण नसते. बाहेरून येणाऱ्या मंडळीचा परिसरात धुमाकूळ सुरू असतो ही बाब लक्षात घेऊन हिंजवडी पोलीस स्टेशन येथील दामिनी पथकातील साहसी पुनम करे आणि रूपाली भोसले यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत अनुभवाचे धडे दिले. टवाळखोरांचा बंदोबस्त त्वरित दामिनी पथक करेल असे आश्वासन त्यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना दिले.
आजच्या असुरक्षित परिस्थितीत सुरक्षित कसे राहता येईल याचे मार्गदर्शन सर्वांनाच खूप मोलाचे ठरले. शालेय परिसरात दामिनी पथक नेहमीच उपस्थित असते. महिला, तरुणी, विद्यार्थिनीं यांची सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, लैंगिक शोषण, विविध समस्या, मंगळसूत्र हिसकावणे याबाबत महिलांनी कशी काळजी घेतली पाहिजे तसेच गुड टच बॅट टच यांचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावण्यात आला. इन्स्टा, फेसबुक यावर होणारी मैत्री किती घातक ठरू शकते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री.राजेंद्र बांदल सर संचालिका सौ. रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रिया लढ्ढा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच पर्यवेक्षिका इंदू पाटील, कल्याणी शेळके, शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले. दामिनी पथकामध्ये सर्वांनी एकमेकांचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन घेतले.





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*