महिलांची सुरक्षितता व मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याचा विद्यार्थ्यांना दिला संरक्षणाचा कानमंत्र !!
सूस :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सूस शाखेमध्ये शनिवार दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी पिंपरी चिंचवड विभागातील हिंजवडी येथील दामिनी पथक महिला व बाल सुरक्षा प्रशिक्षणासाठी सज्ज झाले. शहरातील बहुतेक शाळा व महाविद्यालयात विद्यार्थिनी साठी सुरक्षिततेचे वातावरण नसते. बाहेरून येणाऱ्या मंडळीचा परिसरात धुमाकूळ सुरू असतो ही बाब लक्षात घेऊन हिंजवडी पोलीस स्टेशन येथील दामिनी पथकातील साहसी पुनम करे आणि रूपाली भोसले यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत अनुभवाचे धडे दिले. टवाळखोरांचा बंदोबस्त त्वरित दामिनी पथक करेल असे आश्वासन त्यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना दिले.
शालेय परिसरात दामिनी पथक नेहमीच उपस्थित असते. महिला, तरुणी, विद्यार्थिनीं यांची सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, लैंगिक शोषण, विविध समस्या, मंगळसूत्र हिसकावणे याबाबत महिलांनी कशी काळजी घेतली पाहिजे तसेच good touch and bad touch यांचा विद्यार्थ्यांना अर्थ समजावण्यात आला. विद्यार्थ्यांना तसेच संरक्षणावर आधारित चित्रफित दाखवण्यात आली. इन्स्टा, फेसबुक यावर होणारी मैत्री किती घातक ठरू शकते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनी प्रथम स्वतःची सुरक्षा कशी घ्यावी आणि इतरांना कसे सहाय्य करावे संरक्षण करण्याचा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर संचालिका सौ. रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरीविंकल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने करण्यात आले. पर्यवेक्षक सचिन खोडके व नेहा माळवदे यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थी वर्ग यांच्या सहकार्याने करण्यात आले. दामिनी पथकामध्ये सर्वांनी एकमेकांचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन घेतले. आजच्या असुरक्षित परिस्थितीत सुरक्षित कसे राहता येईल याचे मार्गदर्शन सर्वांनाच खूप मोलाचे ठरले.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी