November 22, 2024

Samrajya Ladha

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा, विद्यापीठ हायस्कूल व आरुणी विद्या मंदिर यांच्या वतीने ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा..

पुणे विद्यापीठ :

आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी क्रांतिकारकांनी व नेत्यांनी प्राणांची आहुती दिली. म्हणून भावी पिढीने स्वातंत्र्य टिकविण्यासाठी व देशाला गौरवान्वित करण्यासाठी कायम सज्ज राहावे, असा मोलाचा संदेश प्रमुख पाहुणे बापूलाल कछावा यांनी दिला.तुम्ही भारत देशाचे भविष्य आहात जे कराल ते देश समोर ठेवून करावे. आपले शिक्षक आपले खरे हितचिंतक असतात असेही त्यांनी सांगितले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा, विद्यापीठ हायस्कूल व आरुणी विद्या मंदिर यांच्या वतीने ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने प्रशालेच्या मैदानात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे बापूलाल कछावा ( Head Constable International Border Force) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य जयंत इनामदार, शिशुविहार प्रशालेच्या मुख्याध्यापिका विजया बराटे, विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक विष्णू मोरे, आरुणी विद्यामंदिरच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रद्धा कदम, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत सादर केले. विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य खेळाडूंसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती संदर्भात विद्यार्थी व पालकांना माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका विजया बराटे यांनी तर पाहुण्यांचा परिचय सुनीता वांजळे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत आगवणे यांनी केले तर आभार शिक्षक प्रतिनिधी मनोज खटावकर यांनी मानले.