खडकवासला :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिनानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकवासला मतदार संघात नोकरी महोत्सव घेण्यात आला. पुणे शहरातील प्रत्येक विधानसभेत राष्ट्रवादी युवा नोकरी महोत्सव घेण्यात येतो आहे. या नोकरी महोत्सवास युवकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.
युवकांच्या भविष्याचा दृष्टीने नोकरी महोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवकांना सक्षम करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून नोकरी महोत्सवाचा धडाका सुरू ठेवला आहे. जास्तीत जास्त युवकांना नोकरी मिळवून देण्याचं ध्येय माझ्या सर्व सहकार्यांच्या साथीने आम्ही नक्कीच गाठू हा ठाम विश्वास मला वाटतो : समीर चांदेरे(युवक अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)
आज खडकवासला मतदारसंघाचे युवक अध्यक्ष सागर कोल्हे, सौरभ भाऊ मते यांच्या प्रयत्नातून खडकवासला विधानसभेतील युवांसाठी नोकरी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. खडकवासला मतदारसंघ शहरी व ग्रामीण भागात विभागला गेला असला तरी आयोजकांनी उत्तम नियोजन आणि पूर्वतयारी करुन जास्तीत जास्त युवकांपर्यंत नोकरी मेळाव्याची माहिती पोहचवण्याची जबाबदारी पेलली आहे. यावेळी सागर चंदनशिवे यांना खडकवासला मतदार संघाच्या युवक निरीक्षक पदी तर अथर्व हनमघर यांची पुणे शहर युवक उपाध्यक्ष पदी निवड करुन त्याबाबतचे पत्र देत युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आजच्या नोकरी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी पुणे मनपाचे माजी नगरसेवक दिलीप आबा बराटे, प्रदीपजी धुमाळ, अर्चना ताई हनमघर, युवक कार्याध्यक्ष मनोज बालवडकर, निखिल शर्मा, ऋषिकेश थोरवे, सूरज गायकवाड, युवती शहर उपाध्यक्षा श्रेया ताई तांबे, पुरंदर हवेली युवक अध्यक्ष गणेश अण्णा झांबरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..