सुतारवाडी :
15 ऑगस्ट 2024 रोजी भारत देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सन शाईन प्रीस्कूल व शिवसेना शाखा सुतारवाडी या ठिकाणी ध्वजारोहण व राष्ट्रगीत याचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे सनशाइन मधील लहान चिमुकल्यांनी आपल्या भाषणामधून देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी प्रमुख पाहुणे ज्योती मॅडम दत्तात्रय चितारे (हेड कॉन्स्टेबल एस पी ऑफीस पुणे ग्रामीण), तसेच ॲड. लक्ष्मण करे(नोटरी वकील), चिंतामण तात्या जाधव(ज्येष्ठ अभ्यासक), मधुकर निम्हण (मराठा नेते), त्याचप्रमाणे सुतारवाडी मराठा सहाय्यक संस्था पदाधिकारी शशिकलाताई भोसेकर,;नारायण सुतार, नरहरी सुर्वे, ज्ञानेश्वर सुतार, शंकर सुतार, अविनाश गोळे, संदीप सुतार, गुंडगळ, रूपाली सुतार, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी संजय आप्पा निम्हण, अजय दादा निम्हण, अशोक भाऊ दळवी, विभाग संघटिका स्वातीताई रणपिसे, राष्ट्रवादी महिला प्रभाग अध्यक्ष उज्वला जाधव, सोनाली सुतार तसेच लक्ष्मणजी ओव्हाळ ,मनीष दादा चक्रनारायण, वंचित आघाडीचे नारायण तात्या जाधव, राम भाऊ चव्हाण, स्वराज्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते दादा भिसे, गणेश दादा मोरे, करण दादा कांबळे, सनशाइन प्री स्कूलचे पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम शिवसेना शाखाप्रमुख अमोल दादा फाले यांनी नियोजन केला. हे कार्यक्रम महेश भीमराव सुतार सनशाइन प्री स्कूल व फकीरा फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले.
More Stories
बाणेर बालेवाडी येथील गायत्री तांबवेकरची सायकलिंग मध्ये सुवर्ण कामगिरी..
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…