पुणे :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे शहरात संघटन वाढविण्यासाठी शाखा बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला असून पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा युवक अध्यक्ष प्रसाद चौगुले यांच्या पुढाकाराने आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते तसेच आमदार चेतन तुपे साहेब यांच्या उपस्थितीत पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पहिल्या शाखेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभेतील या पहिल्या शाखेचा अध्यक्ष म्हणून प्रज्वल मोहिते याची निवड देखील केली आहे. येत्या काळात संपूर्ण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे जाळे तयार होईल हा मला विश्वास आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असून युवकांचा मिळणारा मोठा प्रतिसाद आमचा उत्साह वाढविणारा आहे : समीर चांदेरे (युवक अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस
यावेळी महाराष्ट्र युवती अध्यक्ष संध्या ताई सोनवणे, पुणे शहर उपाध्यक्ष मोसीन भाई शेख, युवक कार्यध्यक्ष अब्दुल भाई हाफिज, युवक उपाध्यक्ष निखिल शर्मा, पुरंदर हवेली युवक अध्यक्ष गणेश झांबरे, लावण्या ताई शिंदे, शीतल ताई येनपुरे, श्वेता ताई मिस्त्री, युवक उपाध्यक्ष ऋषिकेश थोरवे उपस्थित होते.



More Stories
दुर्गासाठी न्यायाची हाक; बाणेरमध्ये शेकडो नागरिकांचा मूक मोर्चा
ज्ञानेश्वर तापकीर यांना राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या वतीने ” यशवंतराव चव्हाण सहकार महर्षी पुरस्कार” प्रदान …..
परीक्षा पे चर्चा २०२६ उपक्रमाची पेरिविंकलच्या सर्व शाखांमध्ये उत्स्फूर्त व यशस्वी अंमलबजावणी!!!