November 22, 2024

Samrajya Ladha

सीएम इंटरनॅशनल स्कूल संघाला आंतर शालेय चौदा वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत विजेतपद…

पुणे :

शिक्षण विभाग, पुणे मनपा आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर शालेय चौदा वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात सीएम इंटरनॅशनल स्कूल संघाने गतविजेत्या बिशप्स को-एड, उंड्री संघाचा ३-० गोलने पराभव करून विजेतेपद जिंकले.

बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेतील अंतिम लढतीत सीएम इंटरनॅशनल संघाच्या मुलींनी सुरूवातीपासूनच योग्य नियोजन आणि योग्य पासिंग करून बिशप्स् संघाच्या मुलींवर दबाव टाकले. यात त्यांच्या १६ व्या मिनिटाला शर्वरी मानेने दिलेलया पासवर आरना सिंधवने गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळून दिली. त्यानंतर १९ व्या मिनिटाला पुन्हा शर्वरी मानेने हिमाणी रावतला पास दिला,
हिमाणीने कोणतीही चूक न करता चेंडू बिशप्सच्या गोलमध्ये टाकला. त्यानंतर बिशप्सच्या गोलच्या सीएम इंटरनॅशनलच्या मृण्मयी सोनइकरने त्यांच्या खेळाडूकडून चेंडू टॅकलकरून ताब्यात घेऊन अर्ध्या रेषेच्या जवळून मृण्मयीने गोलकरून आघाडी ३-० अशी वाढवली. ही आघाडी सीएम इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने शेवटपर्यंत टिकवित सामना जिंकून विजेतेपद जिंकले आणि विभागीय फेरी गाठली.

चॅम्पियनशिपपर्यंतच्या संघाच्या प्रवासात सेंट मेरी स्कूल (२-०) विरुद्ध उपांत्य फेरीतील विजय आणि विद्या भवन शाळेविरुद्ध (५-०) उपांत्यपूर्व फेरीतील विजयांचा समावेश होता. संपूर्ण स्पर्धेत, आयुष्का अधिकारी आणि गोलरक्षक श्रीनिधी कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील संघाचा बचाव एकही गोल न करता अपराजित राहिला.

एसकेपी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर, सचिव डॉ. सागर बालवडकर, प्रा.रुपाली सागर बालवडकर, आणि सी.एम. इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य इकबाल कौर राणा यांनी सर्वांचे मनःपूर्वक कौतुक केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.